शेअर बाजारात आज मंगळवारी 7 फेब्रुवारीदेखील घसरण कायम राहिली शेअर बाजारात नफा वसुलीचा जोर दिसून आला. आयटी, मेटल आणि एफएमसीजी सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स 220.86 अंकांच्या घसरणीसह 60,286.04 अंकांवर स्थिरावला. निफ्टी 43.10 अंकांच्या घसरणीसह 17,721.50 अंकावर स्थिरावला. ITC, HCL Tech, Tata Motors, HUL मध्ये घसरण दिसून आली. आज डॉलरच्या तुलनेत रुपया तीन पैशांनी मजबूत होऊन 82.70 रुपयांवर स्थिरावला कोटक महिंद्रा, बजाज फायनान्स, एसबीआय, टीसीएसमध्ये तेजी दिसून आली. सोमवारी बाजारातील तेजीमुळे बाजार भांडवल 266.54 लाख कोटी रुपये इतके झाले. बाजारात व्यवहार झालेल्या कंपन्यांपैकी 1559 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी तर, 1854 शेअर दरात घसरण झाली