आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,060 रूपयांवर तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,305 रूपयांवर आला आहे.
सोन्याचे दर गेल्या 24 तासांत स्थिर असल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदीची चांगली संधी आहे.
आज एक किलो चांदीचा दर 67,780 रूपयांवर आला आहे.
जागतिक पातळीवर सोन्याचे दर घसरल्याने त्याचा परिणाम म्हणून जळगावच्या सुवर्णनगरीमध्येही सोन्याचे दर 59 हजारांवर आहेत.
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% कमी होऊन 1,585.78 डॉलर प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन 1,796.50 डॉलरवर होते.
स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन 23.44 डॉलरवर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन 1,005.88 डॉलर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन 1,889.50 डॉलरवर पोहोचले आहेत.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.