देशात तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केलेत. देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. पण, काही राज्यांतील शहरांमध्ये किरकोळ बदल झाला आहे. राज्यातही गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. परभणीत 109.45 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 95.81 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. नाशकात पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. छत्रपती संभागीनगरमध्ये पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर आहे.