आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढीचं सत्र सुरूच.

काही काळापासून, कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होतेय.

ब्रेंट क्रूड ऑईल 85 डॉलर्सच्या वर व्यापार करतंय आणि WTI क्रूड ऑईल प्रति बॅरल 80 डॉलरच्या वर व्यापार करतंय.

तरिही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिरच आहे.

काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किरकोळ बदल झाल्याचं पाहाला मिळतंय.

कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राजधानीत एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये आहे.

आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.