आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालीये.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावरच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती निश्चित केल्या जातात.

कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार का? ही चिंता सर्वसामान्यांना सतावतेय

एकीकडे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत, देशात मात्र इंधनाचे दर स्थिर आहेत.

देशातील महानगरांत मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर आज जैसे थेच आहेत.

राजधानीत एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये आहे.

आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.