शेअर बाजारात काही छोट्या कंपन्याही गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवू देतात.



स्टाइलम इंडस्ट्रीज ही अशीच एक चांगला नफा मिळवून देणारी छोटी कंपनी आहे.



स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअरची गणना शेअर बाजारातील सर्वोत्तम मल्टीबॅगर स्टॉकमध्ये केली जाते.



स्टाइलम इंडस्ट्रीज कंपनी स्मॉल कॅप श्रेणीतील आहे.



या कंपनीचे बाजार भांडवल सध्या केवळ 3,230 कोटी रुपये आहे, पण कंपनीचे शेअर्स स्वस्त नाहीत.



सध्या स्टाइलम इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत 1,916 रुपये आहे.



गेल्या काही महिन्यांमध्ये या स्टॉकची किंमत कमालीची वाढली आहे.



गेल्या एका महिन्यात स्टाइलम इंडस्ट्रीजच्या स्टॉकची किंमत 22 टक्क्यांनी वाढली आहे.



गेल्या 6 महिन्यांत हा शेअर सुमारे 85 टक्क्यांनी आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून 70 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.



स्टाइलम इंडस्ट्रीजचे शेअर्स एकेकाळी 10 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होत, आता मात्र हे शेअर्स आता महाग झाले आहेत.



सुमारे 11 वर्षांपूर्वी स्टाइलम इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत फक्त 8.13 रुपये होती.