SBI कडून ठेवीदारांसाठी खास ऑफर देण्यात येत आहे. यामध्ये ठेवीदारांना भरघोस नफा मिळवण्याची संधी आहे.
जर तुम्ही मुदत ठेव योजना म्हणजे एफडी (FD) करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
देशातील सर्वात भारतीय स्टेट बँकेने (SBI) ने ग्राहकांसाठी एक विशेष नवीन ऑफर आणली आहे. SBI बँकेने नवी ठेव योजना सुरू केली आहे.
SBI या योजनेवर PPF, NSC आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांपेक्षा जास्त व्याज देत आहे. SBI कडून ठेवीदारांसाठी खास ऑफर देण्यात येत आहे.
मुदत ठेवींवर 7.9 टक्के व्याज देण्यात येत आहे. यामुळे ठेवीदारांना भरघोस नफा मिळवण्याची संधी आहे.
भारतीय स्टेट बँकेने सर्वोत्तम मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या एफडीवर गुंतवणूकदारांना वार्षिक 7.9 टक्के व्याज दिलं जात आहे. ही नॉन-कॉलेबल मुदत ठेव योजना आहे.
SBI सर्वोत्तम मुदत ठेव ही एक विशेष FD योजना आहे. याचा फायदा घेण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदाराला किमान 15 लाख रुपये गुंतवावे लागतील.
यामध्ये जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.
यामध्ये बँकेकडून गुंतवणुकीच्या कालावधीसाठी 1 वर्ष आणि 2 वर्ष असे दोन पर्याय दिले जातात.
विशेष म्हणजे SBI बेस्ट टर्म डिपॉझिटमध्ये गुंतवणूकदारांना नूतनीकरणाचा पर्याय दिला जात नाही आणि मॅच्युरिटीवर रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांसाठी एक विशेष नवीन ठेव योजना सुरू केली आहे.
PPF, NSC आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या तुलनेत SBI या योजनेवर जास्त व्याज देत आहे.