बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांच्या लग्नाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. पायल आणि संग्राम यांच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लग्नाआधीच्या विधी सुरु झाल्या आहेत. पायल रोहतगी आपल्या लग्नाच्या विधींचा मनमुराद आनंद लुटत आहे. या सोहळ्यासाठी ती विशेष तयारी करत आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यात तिने हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे. लग्नाआधी पायल रोहतगीने खास फोटोशूट केले आहे. या वधूवेशात ती खूप सुंदर दिसत आहे. पायल रोहतगी आणि संग्राम सिंह एकमेकांना जवळपास 12 वर्षांपासून डेट करत आहे. अखेर 12 वर्षांनंतर दोघेही एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांच्या लग्नाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.