देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहेत गेल्या 24 तासांत नवीन कोरोनाबाधितांसह कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे देशात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 18 हजार 840 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे गेल्या 24 तासांत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे नव्या आकडेवारीनुसार, 16 हजार 104 रुग्णांनी गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसंर्गावर मात केली आहे देशात एकूण 4 कोटी 29 लाख 53 हजार 980 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत महाराष्ट्रात शुक्रवारी 2944 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती गुरुवारी राज्यात दोन हजार 678 रुग्णांची तर बुधवारी राज्यात 3142 नव्या रुग्णांची नोंद झाली होती आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात तीन हजार 499 रुग्णांनी कोरोनावर मात केली राज्यात आजपर्यंत एकूण 78 लाख 31 हजार 851 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.91% एवढे झाले आहे