80-90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानी आज (9 जुलै) आपला 62वा वाढदिवस साजरा करत आहे. 1980मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकल्यानंतर संगीताने 1988मध्ये ‘कातिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. संगीता बिजलानी जितकी तिच्या चित्रपटांमुळे ओळखली जाते, तितकीच तिचे सलमान खानसोबतचे नाते चर्चेत होते. सलमान खान आणि संगीता बिजलानी यांनी 1986मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. दोघांचं नातं तब्बल 10 वर्ष टिकलं होतं. लवकरच त्यांचं लग्न देखील होणार होतं. लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. मार, त्याआधीच हे लग्न मोडलं. सलमानने आपली फसवणूक केली असं म्हणत संगीताने लग्न मोडलं होतं. याकाळात सलमान खान अभिनेत्री सोमी अलीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आला होता. या चर्चा संगीतापर्यंत पोहोचल्या आणि तिने थेट हे लग्नचं मोडलं. चित्रपट विश्वात येण्यापूर्वीच सलमान खानचं नाव संगीता बिजलानीसोबत जोडलं गेलं होतं. दोघांची पहिली भेट एका जीममध्ये झाली होती. यानंतर त्यांच्यात प्रेम फुलू लागलं होतं.