अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) आणि संग्राम सिंह (Sangram Singh) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. आग्र्यात त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या 12 वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. अखेर एका तपानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि विवाह बंधनात अडकले. नुकताच हा विवाहसोहळा पार पडला असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर केले जात आहेत. या फोटोंमध्ये दोघेही आपल्या नात्यात एक पाऊल पुढे गेल्याबद्दल आनंदी दिसत आहेत. नुकतेच या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये पायलने सुंदर लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. सोबतच हलका मेकअप आणि भरपूर दागिने परिधान केले आहेत. तर, संग्रामने बेजी रंगाचा शेरवानी परिधान केला आहे. दोघांचा विवाह सोहळा आग्र्यातील जेपी पॅलेसमध्ये पार पडला. लग्नाआधीचे सगळे विधी देखील आग्र्यातच पार पडले आहेत. लग्नाच्या एक दिवस आधी या जोडप्याने प्राचीन मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले होते.