सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. ज्यानंतर भारताने 171 धावांचे आव्हान इंग्लंडला दिले. जे पूर्ण करताना 121 धावांवर इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला आणि भारत 49 धावांनी जिंकला. भारताकडून रोहित शर्मा आणि ऋषभ पंत जोडीने तुफान फटकेबाजी केली. रोहित (31) आणि पंत (26) धावांवर बाद झाला. ज्यानंतर रवींद्र जाडेजाने अनुभवाची कमाल दाखवत नाबाद 46 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन सर्वाधिक 4 तर रिचर्ड ग्लीसनने 3 विकेट्स घेतल्या. 171 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडकडून मोईन अलीने 35 आणि डेविड विलीने 33 ही सर्वाधिक धावसंख्या केली. भुवनेश्वरने सर्वाधिक 3 गडी यावेळी बाद केले. तर बुमराह आणि चहलने प्रत्येकी 2 गडी बाद केले. 3 षटकात 15 धावा देत 3 गडी बाद करणाऱ्या भुवनेश्वरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.