'पावनखिंड' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. 18 फेब्रुवारीला 'पावनखिंड' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 12 जूनला 'पावनखिंड' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. 'पावनखिंड' सिनेमा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा सिनेमा 15 मे पासून सुरू होणाऱ्या 'प्रवाह पिक्चर' या नव्या वाहिनीवर दाखवला जाणार आहे. 'पावनखिंड' सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. बाजीप्रभूंची गाथा सांगणाऱ्या 'पावनखिंड' सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.