रिपोर्टनुसार, आलिया भट आणि रणबीर कपूर 13 ते 17 एप्रिल दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आरके हाऊसमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आता यांच्या लग्नसोहळ्याची गेस्ट लिस्ट लीक झाली आहे. आलिया आणि रणबीरच्या रॉयल वेडिंगला अनेक प्रसिद्ध कलाकार हजेरी लावणार आहेत. करण जोहर, जोया अख्तर, संजय लीला भंसाली, वरुण धवन, रोहित धवन आणि डिजायनर मसाबा गुप्ता हे आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. गेस्ट लिस्टमध्ये आलिया आणि रणबीरच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटांचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्या नावाचाही समावेश आहे. मल्होत्रा, अनुष्का रंजन, अर्जुन कपूर आणि शाहरुख खान हे आलिया आणि रणबीरच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. करीना कपूर खान, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर, नीतू कपूर, सैफ अली खान, महेश भट्ट, मुकेश भट्ट, सोनी राजदान हे आलिया आणि रणबीरच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.