शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट पठाण हा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पठाण हा चित्रपट शाहरुखसाठी खास आहे कारण या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुखने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखच्या या कमबॅकची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत होते. शाहरुखच्या पठाणमधील डायलॉग्सला आणि अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 19 दिवस झाले आहेत. 19 व्या दिवशी म्हणजेच रविवारी (12 फेब्रुवारी) या चित्रपटाने 13 कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदच्या पठाण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, पठाण चित्रपटाने 300 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात लवकर सामील होणारा चित्रपट ठरला. पठाण चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासोबतच, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. पठाण चित्रपटामधील गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.