चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच जॅकलिनने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जॅकलिन हॉट लूकमध्ये दिसली आहे. हलक्या हिरव्या रंगाच्या गाउनमध्ये जॅकलिन खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोशूटसाठी जॅकलिनने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. ग्लॉसी मेकअप, कुरळे केस, ड्रॉप डायमंड आणि उंच टाचांच्या सॅन्डलसह तिने लूक पूर्ण केला आहे. चाहत्यांना जॅकलिनची ही किलर स्टाईल खूपच आवडली आहे. जॅकलिनच्या फोटोंवर चाहत्यांना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इन्स्टाग्रामवर जॅकलिनला 65 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात.