बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. रिलीजआधीच रेकॉर्डब्रेक कमाई करणारा 'पठाण' हा सिनेमा लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. ब्लॉकबस्टर 'पठाण'ने सिनेमागृहात 14 दिवस पूर्ण केले असून रिलीजच्या 14 व्या दिवशी या सिनेमाने 7.80 कोटींची कमाई केली आहे. 'पठाण' या सिनेमाने आतापर्यंत 446.20 कोटींचा गल्ला जमवला आहे. शाहरुखच्या 'पठाण'ची जगभरात 850 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 'पठाण' या सिनेमाचं आणि शाहरुखच्या अभिनयांचं चाहत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील कौतुक करत आहेत. 'पठाण' या सिनेमाला सिनेप्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात यश आलं आहे. 'पठाण' सिनेमातील गाण्यांनीदेखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'पठाण'ने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. शाहरुखसह दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमच्या अभिनयाचंदेखील कौतुक होत आहे.