लवंग खल्ल्याने हडे मजबूत होतात. फ्लेवोनॉयड्स ,मँगनीज आणि यूजेनॉल इत्यादी गोष्टी लवंगामध्ये असतात.



लवंग खल्ल्याने रक्त पातळ होतं तसेच शरीरातील कॉलेस्ट्रोल देखील कमी होते.



जर तुमचे डोके दुखत असेल तर तुम्ही लवंगापासून तायर केलेल्या तेलाने डोक्याची मालिश करावी.



लवंग खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात.



जर चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्स किंवा काळे डाग असतील तर यावर उपाय म्हणून रोज लवंग तेल आणि नारळाचं तेल चेहऱ्यावर लावावे.



लवंग, जिरे आणि दालचिनी घेऊन त्याची पावडर बनवा. एक ग्लास पाणी त्यात एक चमचा मध मिसळून हे मिश्रण गॅसवर ठेवून उकळा. आणि गाळून घ्या.



जर तुम्ही हे पेय रोज रिकाम्या पोटी प्यायलात तर काही दिवसांतच तुमच्या कंबरेची चरबी कमी होईल.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.