सैराट या चित्रपटामुळे आकाश ठोसरला विशेष लोकप्रियता मिळाली.



आकाश ठोसर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असतो.



अकाशच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.



नुकतेच आकाशनं त्याच्या रॉयल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



पांढरा आणि गुलाबी रंगाचा शर्ट, गुलाबी फेटा, काळी पँट आणि डोळ्यावर गॉगल अशा रॉयल लूकमधील फोटो आकाशनं शेअर केले आहेत.



आकाशनं त्याच्या रॉयल लूकमधील फोटो शेअर करुन रॉयल असा हॅशटॅग वापरला आहे.



मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच आकाशनं बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.



लस्ट स्टोरी या हिंदी वेब सीरिजमध्ये आकाशनं प्रमुख भूमिका साकारली.



आकाशच्या झुंड या हिंदी चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



आकाशचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.