चेन्नई येथील OTA म्हणजेच ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीचा पासिंग आउट परेड पिपिंग समारंभ आज पार पडला, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या या सोहळ्याला लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी हजेरी लावली ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये पासिंग आऊट परेड दरम्यान कॅडेट ज्योती बिश्त यांची मार्च ची धुरा सांभाळली यावेळी उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सचे पालक आणि कुटुंबातील सदस्य यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली सोबतच आपल्या पाल्यांना भारतीय सैन्यात कायमस्वरूपी नियुक्ती मिळाल्याच्या या क्षणांना त्यांनी आपल्या हृदयात साठवले नेतृत्व, स्वयंशिस्त आणि युद्ध कलेचे प्रशिक्षण देणारी प्रमुख संस्था OTA चेन्नई च्या कठोर प्रशिक्षणाचा समारोप सोहळा म्हणजेच पासिंग आऊट परेड शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी आवश्यक बौद्धिक, नैतिक आणि शारीरिक गुणांचा इष्टतम विकास हा OTA चेन्नई मधील प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी लष्करप्रमुखांनी समन्वयित कवायतीचे कौतुक केले.