संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवार (20 जुलै) पासून सुरुवात होणार आहे.



संसदेचं हे अधिवेशन हे 20 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये होणार आहे.



या कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण 17 बैठका प्रस्तावित आहेत.



तर या अधिवेशनामध्ये एकूण 31 नवीन विधेयकं मांडली जाणार आहेत.



तर या अधिवेशनामध्ये एकूण 31 नवीन विधेयकं मांडली जाणार आहेत.



तसेच ओडिशा रेल्वे दुर्घटना , समान नागरी कायदा या मुद्द्यांवर देखील चर्चा होणार आहे.



दिल्लीच्या अध्यादेशाचा मुद्दा देखील या अधिवेशनात उपस्थित करण्यात येणार आहे.



या अधिवेशनात विरोधक सरकारला अनेक मुद्द्यांवर घेरण्याच्या तयारीत आहे.



पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवार (19 जुलै) रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती.