गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्ली जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय.

रस्त्यांना नदी-नाल्यांचं स्वरुप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.

एका कलाकारानं जलमय झालेल्या दिल्लीचे AI फोटो शेअर केलेत.

आर्टिस्ट विकास पवार (@vkspwr)नं जलमय झालेल्या दिल्लीचे AI फोटो शेअर केलेत.

भविष्यात संपूर्ण दिल्लीत पाणी भरलं, तर दिल्लीकर कसे प्रवास करतील याचं भीषण वास्तव फोटोंमधून मांडण्यात आलंय

राजधानी दिल्लीत भीषण पावसामुळे पाणी भरल्याचं पाहायला मिळतंय.

दिल्लीतील अनेक भागांत पाणीच-पाणी झालंय.

हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडल्यामुळं यमुनेची पाणी पातळी वाढली, अन् दिल्ली जलमय झाली.

लाल किल्ला, इंडिया गटसह दिल्लीतील अनेक महत्त्वाची ठिकाणं पाण्याखाली होती.

सध्या यमुना नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होतेय.

गेल्या काही दिवसांपासून पाण्याखाली गेलेली दिल्ली हळूहळू पूर्वपदावर येतेय.