भारतातील अनेक राज्यांना पाऊस आणि पुराचा तडाखा बसला आहे.

दिल्लीमध्ये अशी परिस्थिती 45 वर्षांपूर्वी म्हणजेच 1978 मध्ये झाली होती.

दिल्लीतील पुराचा धोका अद्याप टळलेला नाही.

यमुनेच्या पाणी पातळी अजूनही धोकादायक आहे.

आग्र्यातील ताजमहाल जवळील परिसर देखील संपूर्ण पाण्याखाली गेला आहे.

असं म्हटलं जात की एके काळी यमुना नदी लाल किल्ल्याच्या दरवाजा जवळून वाहत होती.

आताही यमुना नदी लाल किल्ल्या पर्यंत पोहचली आहे.

पंजाबमध्येही आस्मानी संकट कोसळले आहे. तर अनेक ठिकाणी पुराचे थैमान पाहायला मिळत आहे.

हवामान खात्याकडून अजूनही या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ल्लीतील पुराचं भीषण रूप आता लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहे.

पुरामुळे दिल्लीतील जनतेचं मोठं नुकसान झाले आहे.