Medicine : उपचार महागले! अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढणार सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. अत्यावश्यक औषधांच्या किंमती एप्रिलपासून वाढणार आहेत. केंद्र सरकार आता औषध कंपन्यांना अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढवण्याची परवानगी देणार आहे. त्यामुळे आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखीनच झळ बसणार आहे. एप्रिल महिन्यापासून अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ होणार आहे. पेनकिलर, ॲंटिबायोटिक तसेच हृदयरोगपर्यंतच्या सर्व औषधांच्या किंमतीत वाढ होणार आहे. महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा वाढणार आहे. औषधांच्या किंमतीत 12 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ करण्यात येणार आहे. दुसरीकडे, शेड्युल ड्रग्जच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे. मात्र, यासंदर्भात किंमती किती टक्क्यांनी वाढणार याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.