तळलेल्या पापडामध्ये तेल आणि फॅट दोन्ही अधिक असते, जे आरोग्यास घातक आहे.
पापडामध्ये वेगवेगळे फ्लेवर आणि मसाले मिसळले असतात त्यामुळे पोटाच्या समस्या उद्धवतात.
पापड वाळवण्यासाठी उन्हात मोकळ्या जागेत ठेवले जातात, त्यामुळे त्यावर धूळ-माती जमा होते, जे आपल्या आरोग्यास घातक असतात.
कॅलरी कमी करायच्या असतील तर पापड खाऊ नका.
जास्त वेळ पापड ताजे रहावे म्हणून पापड तयार करणाऱ्या कंपनी यात प्रिजरवेटीव्ह टाकतात, जे आरोग्यास नुकसान पोहचवतात.
पापडामध्ये मिठासोबत सोडियम सॉल्टही टाकतात त्यामुळे हार्ट आणि किडनीची समस्या असलेल्या लोकांनसाठी पापड हानिकारक आहे.
ब्लडप्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी पापड खाणे टाळावे.
पापडामध्ये फायबर नसल्याने त्याचे पचन होताना आतड्यांवर ताण येतो.
उडदाच्या डाळीचा पापड आरोग्याला घातक असतो, कारण त्यात सोडियमचे अतिरिक्त प्रमाणात असते.
जास्त अॅसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी पापडापासून दूर रहावे.