ओटीटी विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता पंकज त्रिपाठी आता निवडणूकीच्या रिंगणात आला आहे.

पंकज त्रिपाठीला राष्ट्रीय आयकॉन बनवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणुक आयोगाने घेतला आहे.

मतदानाची टक्केदारी वाढवण्यासाठी आणि मतदानाचा प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोग लोकप्रिय व्यक्तींना राष्ट्रीय आयकॉन किंवा ब्रॅंड अँबेसिडर बनवत असते.

यापूर्वी 2014 साली टीम इंडियाचा गोलंदाज चेतेश्वर पुजाराला गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने ब्रॅंड अँबेसिडर बनवण्यात आले होते.

पंकज त्रिपाठी आता निवडणूकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून नव्हे तर जनजागृतीसाठी उतरले आहेत.

केंद्रिय निवडणुक आयोगाने सोमवारी सहा राज्यांतील विधानसभा पोट निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

वेबसीरिजमुळे लोकप्रिय झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत पंकज त्रिपाठीचे नाव अग्रस्थानी घेतले जाते.

पंकज अनेक सिनेमांत झळकला असला तरी मिर्जापूरमधील कालीन भैया या पात्राने त्याला विशेष लोकप्रियता मिळाली.

लवकरच या वेबसीरिजच्या तिसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

पंकज त्रिपाठीच्या अनेक वेबसीरिज चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत.