आज वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव



निसर्गाचे सौंदर्य खऱ्या अर्थाने  वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठते



याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो देवाचा विवाह



वर असतो साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि वधू असते जगन्माता रुक्मिणी



देवाच्या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून लागलेले असतात.



हा मुहूर्त आज दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात  लगीनघाई सुरु आहे.  



सध्या कोरोनाचे  संकट सुरु असल्याने यावर्षी देखील कोरोनाचे नियम पाळून अगदी मोजक्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. 


संपूर्ण विठ्ठल सभा मंडपात फुलांचा महाल करण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे.


पुणे येथील भाविक भारत भुजबळ हे दरवर्षी  देवाच्या लग्नासाठी फुल सजावटीची सेवा देत असतात.