प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबिबचा नुकताच (Jawed Habib) एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबिबचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे केस कापताना जावेब हबीबने पाण्याऐवजी थुंकीचा वापर केला.
जावेद हबिबच्या या किळसवाण्या कृत्यामुळे त्याला अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केले.
त्यानंतर आता जावेद हबिबने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांची माफी मागितली आहे.
व्हिडीओमध्ये जावेद हबिब म्हणतो, 'माझ्या सेमिनारमध्ये जी गोष्ट घडली त्याबद्दल काही लोकांना वाईट वाटले. अशा प्रोफेशनल सेमिनारमध्ये काही मजेशीर गोष्टी कराव्या लागतात.
पण जर तुम्हाला हे आवडलं नसेल किंवा या गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर मी सर्वांची माफी मागतो. '