टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूड पदार्पणापूर्वीच पलक तिवारी आपल्या अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नुकतेच पलक तिवारीने गोल्डन साडीमध्ये सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पलक तिवारीच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीने प्रत्येक प्रकारे स्वत:ला सिद्ध केले आहे. आता तिची मुलगी पलक तिवारीही त्यांच्याप्रमाणे अभिनयाच्या जगात हात आजमावत आहे. पलकने फार कमी वेळात आणि अगदी कमी वयात इंडस्ट्रीत आणि प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. पलक सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते आणि अनेकदा तिचा सिझलिंग अवतार चाहत्यांसह शेअर करत असते.