बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे नवे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. याचे खास कारण म्हणजे अभिनेत्रीचा बदललेला लुक. नवीन फोटोंमध्ये सोनाक्षी पूर्णपणे नवीन स्टाईलमध्ये दिसत आहे. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, तिने तिच्या सिझलिंग स्टाईल आणि स्टायलिश लुकने देखील बरेच लक्ष वेधले आहे. सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत आणि यामागचे मुख्य कारण आहे अभिनेत्रीचे पांढरे केस. ब्लॉन्ड केसांच्या लूकमध्ये सोना एकदम वेगळी दिसत आहे. एवढेच नाही तर तिने केसांच्या रंगाशी जुळणारा हेवी एम्ब्रॉयडरी गाऊन कॅरी केला आहे. फोटोंमध्ये सोनाक्षीचा ड्रेस आणि तिच्या केसांचा रंग अगदी जुळत आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सोनाक्षीचा समावेश होतो. तिने सलमान खानसोबत 'दबंग' चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. कामाच्या आघाडीवर, सोनाक्षी सिन्हा डबल एक्सएल, काकुडा, हरी हरा वीरा मल्लू, सर्कससह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.