लवकरच आजी होणार असलेल्या अभिनेत्री अर्थात बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) आज (8 जुलै) आपला 64वाढदिवस साजरा करत आहे.



नीतू कपूर यांच्या जन्म 8 जुलै 1958मध्ये झाला. नीतू कपूर यांचे खरे नाव हरनीत कौर सिंह असे होते.



लग्नानंतर त्या नीतू कपूर म्हणून प्रसिद्ध झाल्या. नीतू यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली होती.



‘दस लाख’, ‘वारिस’, ‘पवित्र पापी’ आणि ‘घर घर की कहानी’ अशा चित्रपटांमध्ये त्या बालकलाकार म्हणून झळकल्या होत्या.



वयाच्या 15व्या वर्षी त्या मुख्य अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकल्या. या चित्रपटाचे नाव होते ‘रिक्षावाला’.



मात्र, यानंतर आलेल्या ‘यादों की बारात’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांना अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळवून दिली.



यानंतर ‘हम किसीसे काम नही’ या चित्रपटातील ‘लेकर हम दिवाना दिल’ या गाण्यामुळे त्यांच्या करिअरला आणखी गती मिळाली.



यानंतर त्यांच्याकडे चित्रपटाच्या रांगा लागू लागल्या. 1975मध्ये नीतू आणि ऋषी कपूर यांनी पहिला एकत्र चित्रपट केला. या चित्रपटाचं नाव होतं ‘खेल खेल में’.



लग्नानंतर नीतू सिंह ‘नीतू कपूर’ झाल्या. कपूर घराण्यात आल्यावर त्यांनी मनोरंजन विश्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.



ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर त्या संसारात रमल्या. या काळात करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असतानाही त्यांनी कुटुंबांसाठी मनोरंजन विश्वाला गुडबाय केला.