टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावर आपल्या अदांनी धुमाकूळ घालणारी पलक तिवारी सध्या तिच्या ग्लॅमरस लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच पलकने काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये पलकच्या अदा पाहून तिचे कौतुक करण्यापासून चाहते स्वतःला रोखू शकलेले नाहीत. अभिनेत्रीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या फोटोंमध्ये पलक तिवारी एकापेक्षा एक हटके आणि सिझलिंग फोटो पोज देताना दिसत आहे, ज्याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर पलक तिवारीचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करताना दिसतात. सोशल मीडियावर पलक तिवारी कधी तिच्या पारंपारिक लूकमध्ये, कधी ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी बोल्ड अवतारात धुमाकूळ घालताना दिसते. फार कमी कालावधीत पलकने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही विशेष स्थान निर्माण केले आहे.