श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिने अजून चित्रपटात पाऊलही ठेवलेले नाही. परंतु, सोशल मीडियावर ती खूपच प्रसिद्ध झाली आहे. 'बिजली-बिजली' या व्हिडिओमध्ये दिसल्यापासून पलक सर्वत्र चर्चेत आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीने प्रत्येक प्रकारे स्वत:ला सिद्ध केले आहे. पलक तिवारीही अभिनयाच्या जगात आपले नशीब आजमावत आहे. पलकची एक झलक पाहण्यासाठी लोक आतापासूनच वाट पाहू लागले आहेत. पलक देखील तिच्या चाहत्यांना निराश न करता आपले नव-नवीन फोटो शेअर करत असते. प लक तिवारीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दिली आहे. फोटोंमध्ये पलकने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर जंपसूट घातला आहे. अवघ्या 21 वर्षांची पलक इंडस्ट्रीतील इतर अभिनेत्रींना स्पर्धा देताना दिसते. पलकने या ग्लॅमरस आउटफिटसह ओपन हेअरस्टाईल लूक ठेवला आहे. पलकने काळी हँडबॅगही कॅरी केली आहे.