पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने खिशावर बोझा वाढला आहे.



आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली होती.



त्याचा फायदा सामान्यांना मिळाला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर राहिले. पेट्रोलचा दर शंभर रुपयांहून अधिक आहे.



तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या 'ओपेक प्लस'ने (OPEC Plus) मोठा निर्णय घेतला आहे.



तेल उत्पादन प्रति दिन 20 लाख बॅरलपर्यंत कपात करणार असल्याची घोषणा ओपेकने केली आहे.



नोव्हेंबर महिन्यापासून ही कपात लागू होणार आहे.



यामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होण्याची भीती आहे.



कच्च्या तेलाचे दर वधारल्यास भारतातील इंधन दरही वाढण्याची शक्यता आहे.



मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण दिसून आली होती.



चीनमधून कमी झालेली कच्च्या तेलाची मागणी आणि मंदीचे सावट याच्या परिणामी कच्च्या तेलाचे दर घसरले होते.