आता गांजा ऑनलाईन मिळणार, एक ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी पहिल्यांदाच गांजाची ऑनलाईन डिलिव्हरी करणार आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅप्लिकेशननं हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या जगात भलतीच क्रांती आणली आहे आत्तापर्यंत जेवण ऑनलाईन मागवता येत होतं. मात्र आता गांजादेखील ऑनलाईन मागवता येणार आहे. कॅनडातील गांजाचा काळाबाजार रोखण्यासाठी एका ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीने हा निर्णय घेतलाय. गांजापासून बनणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश असणार आहे त्यामुळे चॉकलेट, कँडीज अशा पदार्थांची विक्री होईल अशा प्रकारे सुरक्षित विक्री करून या कंपनीला गांजाची अवैध विक्री थांबवायची आहे मात्र हे पदार्थ मागवताना कंपनीने ग्राहकांच्या वयाची अट ठेवलीय वास्तविक पाहाता अमेरिकेतील 19 राज्यांमध्ये गांजाचं सेवन अधिकृत करण्यात आलं आहे मेनूमध्ये चॉकलेट आणि कँडीज सारख्या अनेक गांजाच्या उत्पादनांचा समावेश असेल