शेअर बाजारात आजची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळी प्री-ओपनिंग सत्रानंतर सेन्सेक्स निर्देशांक वधारला
मात्र, त्यानंतर मोठी घसरण दिसून आली. बाजारात आजही विक्रीचा दबाव असल्याचे संकेत आहेत
शुक्रवारी, अमेरिकन शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. जागतिक शेअर बाजारातही अस्थिरता दिसून आली होती.
जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट दिसत आहे
त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे
आज सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 57,752.50 अंकावर खुला झाला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी निर्देशांक 17,144.80 अंकावर खुला झाला
सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 200 अंकांच्या घसरणीसह 57,719.80 अंकावर व्यवहार करत होता
निफ्टी निर्देशांक 74 अंकांच्या घसरणीवर 17,111.50 अंकांवर व्यवहार करत होता
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात घसरण दिसून आली!