'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला विनोदवीर म्हणजे ओंकार भोजने.
सकाळला दिलेल्या मुलाखतीत ओकांर म्हणाला,मी कोकण हार्टेड गर्ल'चा मोठा चाहता आहे.
इंडस्ट्रीतली आवडती क्रश कोण? या प्रश्नाचं उत्तर देताना ओंकार म्हणाला,क्रश नाही. पण मला 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आवडते.
ओंकार पुढे म्हणाला,मी अंकिताला फॉलो करतो. मला तिचा स्वभाव मला आवडतो.
विनोदाचं परफेक्ट टायमिंग असल्यामुळे ओंकार भोजने अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने ओंकारला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.
ओंकारचा 'सरला एक कोटी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला.
ओंकारचं 'करुन गेलो गाव' हे नाटक आता रंगभूमीवर गाजत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ओंकारने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया दिली होती.
'कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काही पण', 'एकदम कडक' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सारख्या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांत ओंकार सहभागी झाला आहे.