अभिनेत्री कुब्रा सैत हिने नुकतेच 'ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर' हे पुस्तक लाँच केले आहे.



या पुस्तकात अभिनेत्रीने असे अनेक खुलासे केले आहेत, हे वाचल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.



लैंगिक शोषण असो किंवा बॉडी शेमिंग असो, कुब्राने आपल्या पुस्तकात सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे.



वयाच्या 17व्या वर्षी झालेले शारीरिक शोषण आणि रेस्टॉरंट मालकाने घेतलेला गैरफायदा, या सगळ्या गोष्टी तिने या पुस्तकात मांडल्या आहेत.



कुब्राने आपल्या पुस्तकात अनेक मोठे खुलासे केले आहेत.



यातील एक खुलासा सर्वात धक्कादायक आहे, तो म्हणजे अभिनेत्रीचा गर्भपात देखील झाला होता.



या पुस्तकातील एका भागात कुब्राने सांगितलेय की, वन नाईट स्टँडनंतर तिने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता.



ती म्हणते की, हा तिचा स्वतःचा निर्णय होता आणि तिला त्याचा कोणताही पश्चाताप नाही.



2013मध्ये ती अंदमानला फिरायला गेली होती. त्यावेळी ही घटना घडली होती.



‘वयाच्या 23व्या वर्षी लग्न करून, 30व्या वर्षी मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांवरचा दबाव मला समजत नाही. हे एका अदृश्य नियम पुस्तकासारखे आहे. मी त्यासाठी तयार नाही हे मला माहीत आहे’, असे तिने म्हटले.