मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे.

आज मुंबईत 978 रुग्णांची नोंद झाली आहे.

वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

मुंबईत शुक्रवारी 1896 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 84 हजार 148 वर पोहोचली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे.

मागील 24 तासांत दोन रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 612 झाली आहे.

सध्या मुंबईत 9,710 रुग्ण आहेत.