आज अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya 2023) आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच, अक्षय्य तृतीया.
हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे.
विवाह, गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.
वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच, तिसऱ्या दिवसी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो.
या वर्षी 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया हा सण आहे.
अक्षय्य तृतीयेला (Akshay Tritiya) आखा तीज किंवा अक्षय तीज असंही म्हणतात.
अक्षय्य तृतीयेनिमित्त मुंबईच्या सिध्दिविनायक मंदिरात आंब्याची आरास केली आहे
सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे