राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे.

मध्यरात्री मुंबईतही (Mumbai) पावसानं जोरदार हजेरी लावली आहे

वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह मुंबईत पाऊस झाला.

वादळी वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडे पडली आहेत.

तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे देखील उडून गेले आहेत.

मुंबईच्या सर्वच भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला

पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस झाला.

यामध्ये अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.

तर मरोळमध्येही जोरदार पाऊस झाला.

जोरदार वाऱ्यामुळं मरोळमध्ये बऱ्याच घरांचे पत्रे उडून गेले.

मुंबई एअपोर्ट परिसरात देखील वादळी पाऊस झाला.