मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
मुंबई पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे पावसामुळे झाले हाल
पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना कुठल्या प्रकारे राहण्याची
किंवा जेवणाची सोय नसल्याने उघड्यावर त्यांना झोपावे लागत आहे
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस मधील मैदानावर पोलीस भरतीसाठी चाचण्या होत आहे
मात्र या पोलीस भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांना रात्रभर अशाप्रकारे रस्त्यावर रात्र काढावी लागत आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारांची तक्रार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्यात आली आहे
आता त्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारची राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत नाही आहे
त्यामुळे पावसात असे हाल या उमेदवारांना सोसावे लागत आहेत
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेकजण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात.