अॅपल उद्या (१८ एप्रिल) भारतात आपले पहिले रिटेल स्टोअरचे ओपनिंग करणार आहे. अॅपल (Apple) कंपनी लवकरच भारतात आपले पहिले रिटेल स्टोअरचे ओपनिंग उद्या करणार आहे. त्यांचे हे भारतातील अधिकृत रिटेल स्टोअर असून दक्षिण आशियातील अॅपलचे हे सर्वात मोठे पाऊल समजले जात आहे. जिओ वर्ल्ड मॉलमध्ये (Jio World Mall in Mumbai) अॅपलचे स्टोअर ओपन होणार आहे. अॅपलचे रिटेल स्टोअर मुंबईतील बीकेसीच्या बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स येथे सुरु करण्यात येणार आहे या स्टोअरची डिझाईन मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सीसारखी असून स्टोअर दिसायला अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहे. या स्टोअरच्या ओपनिंगमुळे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया योजनेलाही प्रोत्साहन मिळणार आहे. राजधानी मुंबईत हे स्टोअर सुरु होणार असल्यामुळे संपूर्ण मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. मुंबईतील मुकेश अंबानीच्या मालकीचे जिओ वर्ल्ड मॉलमध्ये या अॅपल स्टोअरची सुरुवात करण्यात येणार आहे.