तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या संघ आयर्लंड दौऱ्यावर गेलाय.



या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं एक विकेट्सनं विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.



दरम्यान, आयर्लंडच्या संघानं दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघानं अखेरच्या षटकात 24 धावा ठोकून विश्वविक्रम नोंदवला.



एकदिवसीय क्रिकेटमध्ये अखेरच्या षटकात 24 धावा करणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला आहे.



आयर्लंडविरुद्ध डबलिनच्या द व्हिलेज स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी गोलंदाजी निर्णय घेतला.



त्यानंतर आयर्लंडनं 50 षटकात 9 विकेट्स गमावून न्यूझीलंडसमोर 301 धावांचं लक्ष्य ठेवलं.



या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं 49 षटकांत 9 विकेट्स गमावून 281 धावा केल्या.



या सामन्यातील शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 20 धावांची गरज होती आणि लॉकी फर्ग्युसन, मायकेल ब्रेसवेल क्रीजवर होते.