बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची लेक न्यासा देवगण अलिकडे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. न्यू इअर पार्टीतील अजय देवगणच्या लेकीचा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण न्यू इयर पार्टीमध्ये मित्रांसोबत दुबईमध्ये मज्जा करताना दिसली. या पार्टीमधील फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. न्यासा देवगण दुबईत तिच्या जिवलग मित्रांसोबत नवीन वर्ष साजर करत आहे. त्याचे फोटो न्यासाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो न्यासाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा सुपरहॉट अवतार दिसत आहे. फोटोंमध्ये न्यासा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाचा डीपनेक ड्रेसमध्ये न्यासा कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. या न्यू इयर पार्टीमध्ये न्यासासोबत तिचा मित्र ओरहान अवत्रामणी, तानिया श्रॉफ आणि वेदांत महाजन यांच्यासोबत दिसत आहे. न्यासाने नवीन वर्षाचे मित्रमंडळींसोबत मोठ्या जल्लोषात स्वागत केले. याचा अंदाज या व्हायरल फोटोवरून येत आहे. न्यासा देवगण प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. न्यासाचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा 19 वर्षांची आहे.