अभिनेत्री विद्या बालनचा आज 44 वा वाढदिवस आहे. विद्यानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. विद्याचा जन्म 1 जानेवारी 1978 रोजी झाला. विद्यानं 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या परिणीता या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. परिणीता या चित्रपटात विद्यानं ललिताची भूमिका साकारली होती. लगे रहो मुन्नाभाई, तुम्हारी सुल्लू आणि बेगम जान या चित्रपटामधील विद्याच्या अभिनयाचं देखील अनेकांनी केलं. विद्या जवळपास 134 कोटी संपत्तीची मालकीण आहे. विद्याकडे 14 कोटींचे अपार्टमेंट देखील आहे. विद्याकडे मर्सिडीज-बेंजसारख्या आलिशान गाड्या देखील आहेत. विद्या सोशल मीडियावर सक्रिय असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.