अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. ज्ञानदानं ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमधील अप्पू ही भूमिका साकारली. नुकतेच ज्ञानदानं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कलादर्पण पुरस्कार 2022साठी ज्ञानदानं हा खास लूक केला होता. पैठणीचा ड्रेस, नाकात नथ अशा लूकमधील फोटो ज्ञानदानं शेअर केले आहेत. 'Breezy & Beautiful' असं कॅप्शन ज्ञानदानं या फोटोला दिलं. ज्ञानदाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. ज्ञानदा रामतीर्थकर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. ज्ञानदा ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. ज्ञानदाच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.