हिवाळा सुरु झाला की, ओठ ड्राय होतात आणि त्यामुळे ओठातून रक्त येणं, ओठ दुखणं या समस्या सुरु होतात.



तुम्हालाही सुंदर आणि मऊ ओठ हवे असतील तर तुम्ही या काही टीप्स नक्की फॉलो करा



सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही भरपूर पाणी प्या. त्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहिल त्यामुळे ओठांचा ओलावा टिकून राहिल



रात्री झोपताना ओठांवर बदामाचं किंवा नारळाचं सीरम लावा. त्याचप्रमाणे बाजारात उत्तम प्रकारचे मॉइश्चरायझर लावा



तुम्ही घरच्या घरी हनी स्क्रबदेखील बनवू शकता, मध, साखर मिक्स करुन ओठांवर लावा. त्यामुळे डेथ स्किन निघून जाईल



जमल्यास रात्री झोपताना ओठांवर तूप लावा . असं नियमित केल्यास तुमचे ओठ मऊसुत होण्यास मदत होईल



ओठांवर वारंवार जीभ लावू नका, असे केल्याने ओठ अधिक क्रॅक होतील



उत्तम प्रकारचे लीप बाम वापरा, जेणेकरुन तुमचे ओठ मऊसुत राहण्यास मदत होईल



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)