Ex-बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी झोमॅटोचा वापर, कॅश ऑन डिलिव्हरीने ऑर्डर करायची फूड

Ex-बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी झोमॅटोचा वापर, कॅश ऑन डिलिव्हरीने ऑर्डर करायची फूड

एका तरुणीने झोमॅटोचा वापर करुन एक्स-बॉयफ्रेंडला त्रास द्यायचं ठरवलं.



त्यावर झोमॅटोनं तरुणीला आवाहन करत ट्वीट केलं. त्यामुळे ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रियाची उमटल्या आहेत.



झोमॅटोनं ट्वीट करत लिहिलं आहे की, 'भोपाळमधील अंकिता कृपया तुमच्या एक्स-बायफ्रेंडला व्यक्तीला कॅश ऑन डिलिव्हरीवर फूड पाठवणं थांबवा. ही तिसरी वेळ आहे. तो पैसे देण्यास नकार देत आहे!'



एका तरुणीने एक्स-बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी झोमॅटो फूड डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर केला. या तरुणीने एक्स-बॉयफ्रेंडच्या नावाने फूड डिलिव्हरी ऑर्डर केली.



ही फूड डिलिव्हरी तिने तिच्या एक्स-बॉयफ्रेंडच्या पत्त्यावर मागवली आणि ही ऑर्डर कॅश ऑन डिलिव्हरी होती.



यामुळे तिच्या एक्स-बॉयफ्रेंडला चांगलाच त्रास झाला. एवढंच नाही, तर या तरुणीने एक किंवा दोन नाही, तर तीन वेळा अशाच प्रकारे कॅश ऑन डिलिव्हरी फूड ऑर्डर केलं.



यावेळी संबंधित तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्याने मात्र, झोमॅटोनं थेट ट्वीट करत अंकिताला आवाहन केलं आहे.



दरम्यान, आता ही अंकिता खरी आहे की काल्पनिक आहे हे गूढचं आहे. पण झोमॅटोच्या या ट्वीटमुळे नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन झालं आहे.



या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने म्हटलं आहे की, “मला वाटते….अंकिताने मला एक चांगली कल्पना सुचवली आहे”.