नोरा फतेहीने तिच्या स्टाईलने चाहत्यांना कधीही निराश केले नाही. नोरा आपल्या स्टाईलने अनेकांची मने जिंकत आहे. नोरा ही सध्या दुबईमध्ये आपला वाढदिवस साजरा करत आहे. याचे व्हिडीओ आणि फोटोही तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे चाहत्यांना खूप आवडत आहेत. नोराने शेअर केलेल्या व्हिडीओत ती यॉटवर मजा करताना दिसत आहे. या व्हिडीओत ती डान्स करतानाही दिसत आहे. या पोस्टला तिचे चाहते मोठ्या संख्येने लाईक आणि कमेंट्स करत आहेत.